गंध

गंध असतात मजेचे किती वेगळे

नविनता जेथे,  तेथे गंध आगळे
प्रकार गंधांचे, आठवतात सगळे
पाहून प्रकार गंधांचे,आनंद मिळे
मोगऱ्याचा गंध असे किती मोहक
हिरव्या चाफ्याचा तो धूंद मादक
गुलाबाचा असे किती, दिलखेचक
मदनबाणाचा असे, खूप सुवासिक
गंध मोहराचा कसा दरवळे परिसर
मृदगंधाचा असे, आगळाच  वावर
वेगळेपण दाखवी गंध, भात खाचर
मोहवतो गंध केतकी बनातील फार
औषधाचा असे गंध फारच आगळा
वाणी सामानाचा, गंध असे वेगळा
नवागंध असे घराचा कसा निराळा
नवीन कपड्यांचा, गंधच नव्हाळा
असे ताजेपणा प्रत्येक त्या गंधात
अनुभवण्यास असावे लागे जागृत
घ्राणेंद्रिय संवेदनशील असे खचित
देती आनंद, नित्य नवा सुगंधित