अढी

पाहिला मानवात खूपच  अहंकार

सूडबुद्धी, विद्वेश, इत्यादी  प्रकार
पूर्वग्रह, द्वेष, असा जडला विकार
होई निर्माण मनी,  अढी साकार
चुकीच्या अंधश्रद्धा, धार्मिक रुढी
निर्मिती मनांत, अढीच्या गाठी
जोपासती अढीला अज्ञाना पोटी
करुनिया उध्वस्त, जीवने मोठी
निर्मिलेली अढी  ती  स्वार्थापोटी
घालवणे  अशक्य  तुमच्यासाठी
ताबा  घेई  मनाचा,  प्रथम  भेटी 
पसरे मग जशा कँन्सरच्या गाठी
कुविचाराने  होई, अशी अढी तयार
नाही  करू  देत  सारासार  विचार
अविश्वास दाखवते, कशी प्रगतीवर
उध्वस्त करे जीवन, झिजून शरीर
मेलात  तुम्ही,  अढी  ठेवून  जरी
न मरे अढी,  तुमच्या बरोबर तरी
असे  अनुवंशिक, वंशात  घर करी
निघण्यास अढी,गुरुकृपा हवी खरी