पोट वाढून आता फुगतच चालली ही महागाई
आभाळ छेदून ब्रम्हांड भ्रमंतीची झाली हीला भलतीच घाई
फुगलेल्या पोटातून महागाईची अपत्ये कशी होतील ही कल्पनाच करवत न्हाई
हीच्या वाढत्या पोटाला टोचून फोडण्यासाठी सरकारला सापडेना कोणतीच सुई!
आणि पिचलेला सामान्य माणूस पोट मारून या महागाईपायी ..
दोन घास कमीच खाई..
दोन घास कमीच खाई..
श्रीमंत आणखी श्रीमंत आणि गरीब आणखी गरीबीकडे ओढला जाई..
शेतकऱ्यांना समोर दिसे मृत्यूची खाई..
महागाईपायी तो जीव देई..
नेते, कलाकार, धनदांडगे आणि खेळाडूंना याचे कसलेच सोयर सूतक न्हाई ...
त्यांना कसलाच फरक पडत न्हाई..
ते आपले कोटी कोटी कमवत राही...
महागाई भरारी मारत राही ...
उत्तुंग उत्तुंग उडत राही...
विश्वविक्रम करत जाई...
विश्वविक्रम करत जाई...
सामान्य माणसाची सत्त्वपरीक्षा (आणि स्वत्त्व परीक्षासुद्धा) घेतच राही...