पालवी की पानगळ ... पाहिले काहीतरी
दुखवुनी गेले पुन्हा ... आतले काहीतरी
धाडसाने खोलतो ... आज तुम्हाला जरा
पापण्यांनो दाखवा ... चांगले काहीतरी
पाहिले ना पाहिले ... पाहणे असले तुझे
राहिले आहे म्हणा ... आपले काहीतरी
तू खरी आहेस हे ... मी कुठे नाकारतो?
बोलताना देत जा ... दाखले काहीतरी
माणसांची भिन्नता ... उगवते मातीतुनी
यातले काहीतरी ... त्यातले काहीतरी