काय काळ हा बेफिकीर आला
स्कर्टामधले गुढघे सगळे कळवत होते
पुर्वी नउवारीतिल पाउल चळवत होते
काय काळ हा बेफिकीर आला
लग्नामध्ये लाजत होती दिसली की
पत्नी वाटे पत्नी आता रुसली की
काय काळ हा बेफिकीर आला
ईंद्रीयांना नोटिस पाठव लेका
म्हणाव वय झाले थोडेसे टेका
काय काळ हा बेफिकीर आला
भ्रष्ट निसर्गाची मानव योनी
भोगत बसते जळते शव योनी
काय काळ हा बेफिकीर आला
अणूत होतो, अणूत गेलो, जिथून आलो, तिथेच गेलो
जगून गेलो, मरून गेलो, हळूच गेलो, लगेच गेलो