माय ...

***************************************

कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशिबावर,
फाटकं का होईना..
पांघरूण व्हायला हवं होतं.

पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवून का होईना..
भरपूर पाझरायला हवं होतं.

तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहून राहून मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरून..
मनसोक्त रडायला हवं होतं.

********************************************