भय

रेषा हातातल्या या
हे कोणते नकाशे
ही गूढ शोधयात्रा
अदृष्य द्यूतफासे

य दीर्घ वाळवंटी
निष्पर्ण भग्न वाटा
पाऊल रक्तचिंब
मनी गोठलेल्या लाटा

नजरेपलीकडेही
नजरेत खोल भेगा
अस्वस्थ झोपले मन
अस्वस्थ देह जागा

दोन्ही तीरांवरुनी
आवाज ओळखीचे
अज्ञात दूर पैल
भय येथ जाणिवांचे