च्यायला, एक शर्ट घ्यायला गेलो,
आणि असला शॉक बसला,
कुणी अलका कुबल टाईप आंटी असेल म्हणून इग्नोर करावे,
आणि ती कतरिना कैफ असावी तसा.
=====
ख्रिसमस ईव्ह.
एन ई सी च्या प्रॉजेक्टसाठी जपानला परत एकदा निघालो होतो.
आणि प्रत्येक ऑनसाईट ट्रिपआधी एखादा शर्ट वा पँट घ्यायची,
अशी ट्रॅडिशनच झाली होती लास्ट फ्यू इअर्स.
इटस लाईक धिस.
ओल्ड क्लोथ्स डिस्कार्ड करणं काही होत नाही माझ्यानं.
आणि कितीही नवीन क्लोथ्स असले,
तरी ओल्ड क्लोथ्सच सगळं नेटवर्क सॅच्युरेट करून टाकतात.
मग त्याला सोल्यूशन म्हणून
शक्य तेवढ्या फ्रीक्वेंटली नवीन कपडे घ्यायचे,
आणि ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाईम,
त्यातले चाळीसच ठेवायचे,
आणि कुठले चाळीस ठेवायचे हे डिसाईड करण्यासाठी
फिफो अल्गॉरिदम वापरायचा.
ही मेथड वर्क होते माझ्यासाठी.
=====
डिंपू बाहेरच बसली ऍक्टिवावर.
फॉर क्वाईट सम टाईम ती असंच बिहेव करतेय.
तिच्याशी कोण डिबेट करणार?
=====
आत गेलो नि असा काही अमेझिंग शर्ट दिसला,
स्काय ब्लू, विथ अ हिंट ऑव्ह मजेंटा.
आय जस्ट हॅड टू बाय इट.
मग त्याला मॅचिंग ट्राउजर मिळेल का हे पाहत बसलो.
टाईम गेला जरासा, पण इट वॉज नेसेसरी.
आफ्टर अ लाँग लाँग टाईम आय हॅड फॅन्सीड समथिंग.
आणि एनिवे डिंपू तिचा आयपॉड घेऊनच येते बरोबर.
सो आय डिडंट हॅव टू वरी.
=====
बाहेर पडलो, तर काय?
अ प्रेटी यंग गर्ल वॉज स्क्रीमींग ऍन जंपिंग.
अँड अ गाय लिफ्टेड हर.
ओ माय गॉड.
दॅट वॉज द मोमेंट ऑव्ह अवेकनिंग.
ट्वेंटी ईअर्स अगो मीही डिंपूला लिफ्ट केली होती अशीच.
वी वर सपोज्ड टू बी इन लव्ह ऍन ऑल दॅट.
=====
डिंपू हॅज हर व्हर्जन ऑव्ह द स्टोरी,
पण इफ यू आस्क मी,
दॅटस अनऍडल्टरेटेड बुल.
पण उगाच कशाला फाईट करा.
आफ्टर ऑल,
इटस नॉट अ शो-स्टॉपर.
=====
एनिवे, तर मी डिंपूला लिफ्ट केली होती सम ट्वेंटी इअर्स पूर्वी.
मग तिथनं,
गेटिंग मॅरिड वगैरे कसं लॉजिकली फॉलो झालं.
दोघांनाही 'कोसिल'मध्येच जॉब मिळालेला.
पहिलं वर्ष तर काही रिअलाईज व्हायच्या आतच एंड झालं.
आणि सलील झाल्यावर तर काय,
ऑनसाईट जायला मिळालं पाच वर्षं.
पूर्वा तरी अमेरिकन सिटिझन झाली बाय बर्थ.
=====
डिंपूने जॉब सोडला होता बॉस्टनला जायचं म्हणून.
खरं तर 'जीव्हीकें'नीच मला सजेस्ट केलेलं,
की तिला फारसं ब्राईट फ्यूचर नाहीये करियरमध्ये.
बीईंग इंटेलिजंट अँड ऑल दॅट इज ओके.
पण पीपल स्किल्सही हवीत ना?
तिच्याकडे झीरो होती.
आय नो, माझी टेक्निकल स्किल्स खूपच रस्टी आहेत.
पण आय ऍम स्टिल अ सक्सेसफुल पी एम.
शेवटी टेक्नॉलजी कुठलीही असली,
तरी ड्रिव्हन बाय ह्यूमन्सच ना?
तर, तेव्हा गोड बोलून डिंपूला जॉब सोडायला लावला.
दॅट प्रॉबॅब्ली वॉज द ओन्ली जॉइंट डिसिजन दॅट वॉज राईट.
=====
बॉस्टनमध्ये कूल होतो आम्ही सगळे.
पण अचानक डिंपू म्हणायला लागली परत इंडियाला जायचं.
सलीलच्या मराठीला ऍक्सेंट यायला लागला होता ऑर समथिंग.
ऑनेस्टली, आय डिडंट केअर टू हूटस.
च्यायला मराठी यूज तरी करेल का तो मोठा झाल्यावर?
पण तेवढ्यात मिं. मीरचंदानींचं प्रपोजल आणलं सुधीरने,
आणि मग सगळा पर्स्पेक्टिव्हच चेंज झाला.
आलो परत सगळे.
=====
ते व्हेंचर काही क्लिक झालं नाही.
पण डिंपूनं नवीनच प्रॉब्लेम क्रिएट केला.
आमच्या बिझिनेस प्लॅनबद्दल तिची ऑब्जेक्शन्स,
तिनं ऍज यूज्वल टॅक्टलेसली मांडली.
मीरचंदानी जस्ट फ्रीक्ड आऊट.
दोन महिने लागले त्यांना पॅसिफाय करायला.
एनिवे इट वॉजंट वर्किंग आऊट.
स्टिल, त्यांनी सत्यमच्या राजूशी बोलून,
सुधीर नि मला प्लेस केलं व्यवस्थित.
=====
तेव्हा डिंपूकडे परत गेलो असतोच असं नाही.
इट वॉज टच अँड गो.
पण शेवटी म्हटलं किडस आर इन्वॉल्व्ड, सो लेट इट बी.
काय खूष झाली होती डिंपू तेव्हा,
मी स्वतःहून गेलो म्हणून.
मी ऑनसाईट गेलेलो म्हणून सांगितलं होतं तिने किडसना.
सुधीरचा मुलगा सलीलच्या वर्गातच आहे,
त्याच्याकडून कळलं होतं ते मला.
मुकाट चॉकलेटस, टॉईज घेऊन गेलो.
आणि डिंपूकरता ब्लू कूरसाओ.
वी पॅच्ड अप.
=====
हे सगळं रिमेंबर करायचं कारण म्हणजे,
दॅट गाय, द वन हू लिफ्टेड दॅट गर्ल.
=====
नॉर्मली मी कुणालाही पटकन रिऍक्ट करीत नाही.
पण आय जस्ट फेल्ट लाईक टेलिंग द गाय,
फर्स्टली,
लिफ्ट करणं सिंपल असतं,
पुटिंग डाऊन सगळ्यात ट्रिकी.
सेकंडली,
इफ यू डोंट पुट हर डाऊन,
शी विल बी ऑल्वेज अबव्ह यू,
इर्रिस्पेक्टिव ऑव्ह व्हॉटेव्हर शी डज,
ऑर डजंट.