बावरी मी

बावरी मी ...

बावरी मी, बावरा तू

बावरा झाला ऋतू.

गंधवेणा सोसवेना

मोगरा आला ऊतू...

चांदण्यांच्या चंदनाने

लिंपीले अंगांग तू...

गर्द गहिऱ्या मेघुटांसा

बरसुनी गेलास तू ...

बावरी मी, बावरा तू

बावरा झाला ऋतू ...