हातचा
===============
.
.
हाती अर्धाच प्याला,
म्हणता सौख्य कळेना..
अवीट जीवन गोडवा,
मग जिभेवरी रुळेना..
.
स्वीकार मीच न केला,
माझ्या अपूर्णतेचा..
आसवांच्या अंध धारा,
राहिल्या देत ठेचा..
.
हाती अर्धाच प्याला,
जो तो बघे रिकामा..
धडपडा जीव "वेडा",
हताश नि निकामा..
.
जन्म आशा निराशा,
मन आंदोल साहवेना..
हातचा आधार विसरता,
जीवनी संघर्ष चुकेना..
.
हाती अर्धाच प्याला,
म्हणता सौख्य कळेना..
हा सोहळा असण्याचा,
हृदयांतरी खुलेना..!
.
बेरजेत मोजावयाचा,
हातचा राहून गेला..
जोडून त्यास घेता,
गोषवारा नवाच आला..
.
हाती अर्धा (च) प्याला,
कोट कोट सुखाचा...!
हाती अर्धा (च) प्याला,
काठो-काठ सुखाचा...!
.
.
===============
स्वाती फडणीस... २१०११०