वार्धक्य

कळा ज्या लागल्या मम दाता

कळेना मज काय करावे आता
मस्तकी जाई शूळ दात हलता
मरणप्राय  दुःख  होई  झोपता
गेलो दंतवैद्याकडे उठुनी सकाळी
सांगितली  राम कहाणी सगळी
सोडविण्यास विनंती  मी  केली
डॉक्टर  तुम्हीच हो माझे वाली
दंतवैद्य उघडण्यास सांगे जबडा
अवलोकन करण्यास असे खडा
हलवुनी दातास तो देई हिसडा
पुन्हा मरणप्राय यातनांचा झगडा
डॉक्टर म्हणे, मजला हो काका
काय  सांगतो मी  ते  नीट  ऐका
दातासही आले वार्धक्य बरं का
काढून टाकू टाकू तो पकडून टोका
देई इंजेक्षन, तो डॉक्टर बापुडा
बधीर होत असे माझा हो जबडा
घेऊनी हाती पक्कड आणि चिमटा
काढून टाके हलता दात फाकडा
विचार आला हा माझ्या मनांत
आपणही झालो म्हातारे जगात
कामासही पडतो,  अपुरे घरात
काढून टाकतील का हो दारात?