भक्तीचा मार्ग एकच तेव्हढा त्यांना भावे
आपणासी ठावे ते विठ्ठलासीच अर्पावे
कोणी गाती ,नाचती, कोणी काव्यही करावे
कोणी देती शिधा, कोणी आश्रय माझ्या नावे
भक्तीची निरनिराळी रुपे मी सततच बघतोय
'या' सर्वच ज्ञानियांनो या, मी विठ्ठल बोलतोय
जगात विखुरलेले माझे अंश मी अनुभवतोय
होय! मीच, मीच ह्या दिंडीचे नेतृत्व करतोय
देशी-परदेशी, लाल-पांढऱ्या माझ्याच पेशी
मीच तो रवी अन शशी, पण राहतो भारत देशी
तो होतोच पावन जो कोणी ही भूमी स्पर्शी
या भेटण्या येथे ना कोणी सान थोर महर्षी
असे मी मदर मेरी, माय माऊली, आणि ख्रिस्त
कोठे मोहम्मद, आणि सर्वत्र मीच आहे फक्त
धडकले माझे हृदय, जरी आहे मी जगन्नाथ
ऐकतोय लंडनहून देखिल येतोय एक रथ
कसे असतील वारकरी मी भारावलो आहे
माझे आप्त बघून आज सुखावलो गेलो आहे
हा तो थवाच भक्तांची काळजी घेणार आहे
औषधांसवे विश्वास, भक्ती वाटणार आहे
आश्चर्यमुग्ध होऊन मी रखुमाईस म्हणालो
बघ, कळलेच नाही, कधी लंडनला पोहोचलो
थेम्स भासे चंद्रभागा अन माझा मी न उरलो
वीट अतुट त्या विश्वासाची भक्कम करत राहिलो
तेथेही आहे, येथेही आहे मी तरीही
भक्त्तांना दूःखमुक्त करण्या या, करा वारी ही
कमरेवरचे हात माझे देतो तुमच्या हाती
करतो वंदन तुम्हांस, हस्तांदोलन करा तुम्ही
होय ! माझ्या लेकरांनो असा कुठेही जगी या
बघा भक्तीची ही अनंत रुपे, 'या वारीस या'