परतफेड

नागव्या ओंजळीत गोंडस तान्हुले
झोपडीत खेळती कृष्णाची पावले

दिवसाच्या कष्टाच्या बांधुनी मोट
हाती पडली दहा रुपयाची नोट

बाळमुठीमध्ये तीने ती कोंबली
गोड हसे तो अन ती श्रीमंत झाली

भोग आपले ना येवोत वाट्याला
विनवे सटवाईला, यश लिहीण्याला

गालावर उमटते पोटातील खळी
भालावर प्रकटते चिंतेची पाकळी

खोल खाणीत  कामाला ती गेली
रणरण रेतीत तो साद आर्त घाली

खुप शिकून तोही मोठा साहेब झाला
नोट दहाची दिली तिला खर्चायला