माझाच व्हावा मला नित्य आधार

कोठे मिळावा प्रकाशात शेजार
कोठे उरावा मनाचाच अंधार

का जात नाही अता सूर्य अस्तांस?
मोजून केला कुठे आज शृंगार...

राजा निघाला गुन्हे संपवायास...
त्याचे गुन्हे मोजण्या कोण येणार?

माझे, मनाशी तुझ्या, मागणे हेच..
माझाच व्हावा मला नित्य आधार

ती जायची रोज अर्ध्याच भेटीत
अन त्यातही तीच घालायची वार

सांगून गेले खुणा काळजातील
ठोठावलेले तिचे बंदसे दार

तू कोण लागून गेलीस राणी..., कि -
सारे तुझ्या फायद्याचेच होणार..?

त्यांना कुठे माहिती कोण माणूस?
ते गोडवे माकडाचेच गाणार....

होते जरी ताकदीचे किती मल्ल...
रामास होती तरी पाहिजे खार....