पेटले वावर....

पेटले वावर
कर्ज डोक्यावर
झाले अनावर
दोष कोणावर

गेलो नदीवर
प्रतिबिंब पाण्यावर
हसले माझ्यावर
बोलले क्षणभर..

विकले घरदार
रडले बायको पोर
उपाशी मरणार
का घडते वारंवार?

श्रम केले अपार
उभा केला संसार
समाधानाची भाकर
मिरची लागते साखर..

पिकलं दानं चार
हिमतीने सोसला सारं
विचार घालती येर झार..
नको मानू तू हार..

परतलो शेतावर
राख ढीगभर
घेतली मूठभर..
उडवली वाऱ्यावर!!