नाती..

प्रसंगातून कधी भेटतात नाती
काही  क्षणिक काही जन्मांसाठी

न पाहता हि कधी जुळतात नाती
देवाच्या देवार्यात जळतात वाती

प्रेमाच्या सहवासात बहरतात नाती
दे आपुलकीचं खतं विश्वासाची माती

आयुष्याच्या चढ-उतारात जपतात नाती
न समजलेलं नात आणखीनं समजण्यासाठी !