सुगंध काटेरी

अनाथ थेंब
अब्रूच्या पानावरील
मोतीच भासे असे तोही एक
ह्याच समाजातील

कळ्या ह्या
देवाच्या ओंजळीतून सांडलेल्या
हृदयाच्या गाभाऱ्यात
कोपऱ्यात  धीरगंभीर

उथळ मृगजळात
काटेरी कोंब
कल्पवृक्ष की
शहारा विस्कटलेला

उध्वस्त उगम
मुक टाहो
देखणी फुले
न बोलता दरवळतील