प्रेम प्याले ओठ माझे चकवुनी
मोरपीशी स्पर्श झाले जवळुनी
नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी
शब्द माझे खोल गेले हरवुनी
नाव माझे ऐकु आले परतुनी
मी विसरले भान माझे हुरळुनी
चित्र त्याचे गोड गेले तरळुनी
श्वास माझे द्रूत झाले फसवुनी
स्वप्न माझे रात्र ल्याले हरखुनी