सगळे छोटे मुंग्यांइतके,
एखादा पण दिसे डोंगळा ।
फरशीखाली मोठी गजबज,
ओली माती, डाव पांगळा ।।१॥
"माझी इच्छा इतकी मोठी"
"छे, छे, माझी त्याहुन मोठी"
स्वप्नीसुद्धा स्पर्धा येथे,
आकांक्षांचा उगा सोहळा ॥२॥
तू ये रे ये माझ्यापाशी,
मी असतो त्या 'अमक्या'पाशी ।
अमके खोटे, तमके खोटे,
फसवे सगळे, जीव गुंगला ॥३॥
खटपट, वळवळ इथे रोजची,
फरशी सीमा तरि ठरलेली,
जागा नाही, इथेच जगणे,
किती शिरांवर देह मांडला? ॥४॥
ठरते आता दुसरी फरशी-
-शोधायाची, सरते आयू,
अन् अगतिकता येते,
उरतो आतापुरता डाव चांगला ॥५॥
- चैतन्य दीक्षित