रिटायर्ड माणसाला कोंबडी परवडत नाही'.....!

 नुकताच रिटायर्ड झालो 
पेन्शन कसली 
१५२० रुपये मासिक महिन्याची 
पेन्शन चालू होईल 
होईल तेव्हा होईल ......!
कधी होईल माहीत    नाही ....? 
परवाच कोंबडी खायची इच्छा झाली 
बायको वेंतागून म्हणाली :
आता पुरे  कोंबडी-बिम्बडी
तुमच्या पेन्शनमध्ये कोथिंबीर तरी येईल का...?
सगळे पेंसे कोंबडी खाण्यात उडवले 
आता काटकसरीने जगा 
त्यांना पण जगू द्या ..........! 
कोंबडी कशी छान दिसते 
 कोंबडी कशी छान  लागते ..
  तिची  तंगडीतर अफलातूनच 
  लोलिपोपचे नाव निघताच
   तोंडाला पाणी सुटते 
 
पूर्वी कसे छान  दिवस होते कोंबडीचे .
रविवारचा दिवस 
छान सुट्टी 
आम्ही दोघे-तिघे मित्र 
कोंबडी आणावयास जायचो 
तिला कापताना मजेत बघत बसायचो 
कोंबडी खाल्ल्यावर मस्त ताणून द्यायचो 
स्वप्नात देखील कोंबडी दिसावयाची  
 पहाटे पहाटे  कोंबड्याची मस्त  बांग ऐकु  यायची
तेह्वा घरापुढे अंगण होते 
घराला माळवद होते 
अंगणात छान कोंबडी होती 
अशी होती अशी होती 
तुमची ऍश्व्रर्या राय तिच्यापुढे टिंब होती 
कशी छान अंडी घालायची 
त्यात अल्लाची करामत दिसायची 
ताज्या ताज्या अंड्याला 
अफलातून अशी चव होती 
 पाच-पाच सहा-सहा अंडी 
 मी ओंजळीत घेऊन बघायचो 
 प्राजक्ताच्या फुलासारखा 
  त्यांना हलकेच हुंगायचो   
 किती छान छान कोबड्या होत्या
 पांढर्या पांढर्या शुभ्र होत्या 
 पिवळ्या पिवळ्या चोचीच्या 
 नि पक्क्या देशी बांध्याच्या 
 अशा मस्त कोबड्या   
 मी डोळे भरून बघयचो ....!!   
आता खरेच दिवस संपलेत का कोबडीचे …?
नि रिकामे रिकामे दिवस आले  रिटायरमेंटचे !!!