घर आहे !!

घर आहे 
पण घराला घरपण नाही 
अशी घरे खूप आहेत !
 
तो टूरवर 
ती कामावर 
पोरगा पाळणा घरात 
अशी घरे खूप आहेत 
 
आजी नाही !
आजोबा नाहीत !!
वृधाश्रम छान आहेत 
खिडकीतून डोकावणारा  
सूर्य ह्यांना कधी दिसत नाही 
गजावरची  चिवचिव चिमणी 
तिची सनई हे कधी ऐकत नाही 
तो येतो, वाचत बसतो 
ती येते 
टी वी बघते 
त्यातील खोटे दुख कुरवाळीत बसते 
 
हे सोशल कामे करतात 
समाजासाठी काहीतरी करू बघतात 
धडपडतात !!
आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात 
ह्यांना एकमेकाशी बोलायला सुद्धा वेळ नसतो 
घरे आहेत
अगदी मस्त मस्त टोवर आहेत 
पण तिथे प्रेम नाही
सगळा कोरडा व्यवहार आहे 
न सुख आहे न दुख आहे 
अशी घरे खूप आहेत!!!!