निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत !!

किती वर्षापासून  तो  वृक्ष उभा  !
निष्पर्ण ! उघडा !!
पर्णहीन ! म्हातारा खंगलेला !!
निष्पर्ण वृक्षावर पक्षी येत नाही वस्तीला
नाही बांधत आपल्या पिल्लासाठी घरटे
वृक्ष आसुसलेला पक्ष्यासाठी !!
बांधारे घरटे माझ्या अंगणात 
फुकट देतो .फक्त येऊन राहा .
बांधा घरटे.!
रात्रीची तेवढीच मला सोबत
भीती वाटतेरे मला एकटेपणाची
एके दिवशी माणसांची जमात मला नष्ट   करतील
नि नेतील मला जाळायला
आपले टीचभर पोट भरण्यासाठी !!! 
 
 
पण पक्षी येतात.
ऐन हिवाळ्यात!
ओळीने बसतात
सुंदर कोवळे उन पाठीवर घेतात
उबेसाठी बसतात
मस्त शेपट्या हलवीत शिळ घालतात
मेंथून मग्न होतात !
दुपार झाली की  उडून जातात
ही पाखरे ....!!
रात्रीची वस्तीला नाही येत
वृक्ष बिचारा एकटा मुकाट
निष्पर्ण  वृक्ष टकाटका आठवीत  बसतो
आपल्या गतकाळाच्या वेंभावाला
  
मुकाटपणे आपल्या देहाची चिंधी बघत 
कधीपण वनवा  लागू शकतो
संपलेल्या भूतकाळाच्या  
हिरव्या क्षणाच्या  आठवणीला
निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत
नाही येत ती वस्तीला ....!!!!