वृद्धाश्रमी

आनंदाचा भ्रम । नांदतो कायम ॥
निर्माल्याचे ग्राम । वृद्धाश्रमी ॥

कुटुंबी मावेना । सोडूनी जावेना ॥
देवही पावेना । वृद्धाश्रमी ॥

बाळही येईना । काळही नेईना ॥
वेळही जाईना । वृद्धाश्रमी ॥

बाळाची ही कृती । की म्हणू विकृती? ।
लाजली संस्कृती । वृद्धाश्रमी ॥

न घेता आवळा । दिला मी कोहळा ।
अश्रूंचा सोहळा । वृद्धाश्रमी ॥

जगण्या कारण  । जात नाही प्राण ।
हवे ईच्छा मरण । वृद्धाश्रमी ॥

आपल्यांचा वास । नाही आसपास ।
गुदमरे श्वास I वृद्धाश्रमी II

अनोळखी आले । होऊन आपले I ।
होती  डोळे ओले ॥ वृद्धाश्रमी II

वृद्धाश्रमी जाता । वृद्धांना बोलता ॥
जन्मली कविता । वृद्धाश्रमी ॥

निशिकांत देशपांडे   मोंअ. ९८९०७ ९९०२३

प्रतिसादाची प्रतीक्षा