मैत्री ही पत्त्याच्या बंगल्यासारखी असते ..!!

[माझा मित्र एकदा वेतागून म्हणाला: मैत्री  ही पत्त्याच्या बंगल्यासारखी असते 
कधी कोसळेल सांगता येत नाही.मित्र अनुभवी .त्यावरून हे सुचले. 
बघा वाचून  ]
 
तुम्ही एखाद्याला जेव्हा शत्रू  म्हणता 
तेव्हा एक बरे   असते की ,
तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त होता 
तुम्ही कुणाला आपला म्हणता  ... 
मित्र म्हणता  ...!!
की  तुमच्या अंगावर  जबाबदारी पडते [!]
नि तुम्ही मग  जाता  ओझ्याखाली चिरडून [!!]
मग तुम्ही कसे व्हाल मुक्त ??
तणावमुक्त.... ?
   
 तो त्याच्या मित्राला  वाईट म्हणतो   
आजकाल  .... !  
त्यांनी त्रास दिला असे  म्हणतो ..!
[सवय असते एखाद्याला ..!]
तुम्हाला ते ऐकून खटकते न कुठेशी ?
शप्पत सांगा दुखते न कुठेशी ?
अरे..  हा मस्त वाईट म्हणतो ...
साले आम्हाला नाही वाईट म्हणता आले 
आयुष्यात एकदासुद्धा ...?
कुणालाही ..कधीही..??
नि आम्ही आयुष्य आनदाने उधळून टाकले
मैत्रीच्या  नावाखाली 
दोस्ती खूप काळ टिकवणे ही तारेवरची कसरत असते 
ते एक व्रत असते ....
असिधाराव्रत  ...!!
{?}..!!
  
   
दोस्ती हि पत्त्याच्या बंगल्यासारखी असते 
 जा बांधायला ....
बंगला बांधला बांधला असे वाटते 
पाच ,सहा ,सात ईमले बांधल्यासारखे वाटतात 
कसे बरे वाटते ! 
बांधलेत न कधी तुम्ही असले बंगले ?
तुमच्या लहानपणी [?]
तुम्ही बांधलेत नि धपकन कोसळताना पाहिलेत ...!!
टिकला का असला बंगला कधी ?
शप्पत अगदी खरे सांगा ?
तुम्हाला दोस्तीची शप्पत ??
 
दोस्तीचा बंगला असाच त्याने  बांधायला 
घेतला होता 
किती काळ सांभाळला ??
बर्याच  वेळा सतत डागडुजी केली 
फुस्काट  झाला भिंतीचा 
घुशी लागल्या !
वाळवी लागली !!
[असे तो वेतागून म्हणतो]
सगळे पार बिघडून गेले !
माती झाली !!
एक दिवशी तो  निघाला ...
नि परागंदा झाला 
जेथे त्याला  कोणी ओळखणार नाही अशा ठिकाणी गेला 
चला येथे बगला बांधू दोस्तीचा 
[दोस्तीची पण एक नशा असते!!]
   
चार मजले  बांधून झाले आहेत 
तेथेच थांबला 
नाहीतर हा  पण कोसळून जाईल .......!!!
भीती वाटते त्याला ..!
शप्पत !!
हा तरी कोसळू देऊ नको रे देवा ...