सकाळी-सकाळी गरम-गरम नाश्ता वाढल्यावर कोणीतरी पटकन म्हणालं, वा, मस्त!!!
ऑफिसला/ बाहेर जाताना छान तयार झाल्यावर, छान वाटतं आहेस, अस कौतुक झालं, किंवा छान काम केल्यावर शाबासकी ची छाप मिळाली पाठीवर तर कस वाटेल??
छान वाटेल ना? नुसतं छान नाही तर खूप खूप खूप छान वाटेल, बरोबर ना??
तुम्ही म्हणाल, काय झालं आहे हिला, तब्बेत वैगेरे ठीक आहे ना, हा काय विचारायचा प्रश्न आहे का?? तर माझं उत्तर आहे, हो, हाच आहे माझा आजचा विषय.
असं का होत की आपण नेहमी दुसऱ्याकडून शाबासकी मिळावी अशी अपेक्षा करतो, हे नक्कीच खरं आहे की जेव्हा आपल्याला आपल्या आप्तस्वकीयांकडून / मित्र-मैत्रिणींकडून शाबासकी मिळते तेव्हा तो आनंद गगनात न मावणारा इतका असतो. पण माझं म्हणणं हे आहे की त्या आधी म्हणजे जेव्हा आपल्याला आपली एखादी गोष्ट आवडते तेव्हा आपण स्वतः त्याबद्दल स्वतःहाला शाबासकी का देत नाही, का आपण शाबासकी साठी आपल्या आप्तस्वकीय / मित्र-मैत्रिणींवर अवलंबून राहतो??? आणि त्यापुढे जाऊन जर एखाद्या वेळेला आपल्याला आप्तस्वकीयांकडून / मित्र-मैत्रिणींकडून शाबासकी मिळालीच नाही तर त्याच खूपं वाईट का वाटत???
जर आपण आपल्या कामावर/कृत्यावर खुशं/समाधानी आहोत तर मग आपण आपल्या स्वतःला कोणी द्यायच्या आधी शाबासकी द्यायला हवी. स्वतःच कौतुक स्वतः केलं पाहिजे, म्हणजे आपला आत्मविश्वास आभादित राहिलं, नवीन-नवीन गोष्टी करण्याची उमेद/ जिद्द अजून उंचावेल.
धन्यवाद.