आठवण

रोज स्वतःशी  हरते मी,
निःशब्द राहून तुला आठवते मी,
का आठवते म्हणून रडते मी
 आणि रडताना स्वतःवर हसते मी,
अगतिक होऊन गळा आवळून जातो,
तरीही तुझ्या प्रेमाचा ओलावा कसा राहतो?
वाट पाहत दिवस कसनुसा ढकलला जातो,
 तू नसतानाही तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो,
श्वास अडकताना तुझ्या  श्वासात अडकतो,
हुंदक्यांच्या सानिध्यात परत साथ देतो,
मग उदास मनात काट्यांचे रान माजत,
पोखरून पोखरून सुखाचे रक्त काढत,
त्याच थारोळ्यात मन झोपी जात,
तुझ्या मिठीच्या आशेत जग सोडून जात....