मस्त खेडे
थंड हवा गाभुळलेली
सोबत ती
निवांत तळे
हातात हात
आभाळात बगळ्यांची माळ
पिंपळाचे झाड
मस्त पालवीची सोनसळ
झुळझुळ वाहणारी हवा
झुलणारी पाने
टिपिक टुपुक निळे आभाळ
बहरून मन .....
कौलारू घर ...!
मस्त अंगण
भोवती बांबूचे बन
मध्येच सुरकांडी घेत
हिरवा प्रकाश फुलवीत
तरंगणारा काजवा
निळा रंग निळी हवा
देवासमोर छान दिवा
चंदनी उदबत्ती घरभर
पिरंगत सुगंध नवा हवा
बदामी कोळश्याची शेगडी
आंबे मोहर भात
सुगंध त्याचा
वेलांटत घरभर .......
मस्त रात्र थंड हवा
खिडकीतला चंद्र नवा
मनाच्या आभाळात
पक्षांचा गच्च थवा
गच्च झोप मिट्ट झोप
अलगद मिठी
चोचीत चोच
चला असे प्रेम करूया
थोडेसे प्रेम करून बघुया .....!!!
छान स्वप्न बघुया