चारोळी

मागूनी मिळाले आहे

असे काही आठवत नाही

सोसायचे बळ मात्र

येते कुठून कळत नाही

उंचावरून पाणी कोसळते

खाली आपण धुंद होऊन नाचतो

अजाणता असे कित्येक वेळा

आपण दुसऱ्याचे मन दुखावतो

खळाळणारे पाणी कसे

नवी नाती जोडीत जाते

साठलेल्या पाण्यात मात्र

शेवाळंच दाट होते

हवेतल्या धुलिकणासारखं

आयुष्यच भरकटलंय

माती पासून तुटूनही

आभाळ दूर राहिलंय