ध्यान लावून शांत गप्प ..!!

कसे असते हे मन...? 
चंचल चवचाल भिरभिरते हे मन 
नाही बसत शांत एका ठिकाणी 
शून्यात गप्प ठार गुडूप 
सतत धावत असते कोठेतरी 
विनाकारण जाळत बसते मनाची ताकत
कसलातरी गुंता सोडवत राहते हे मन 
हे चंचल चवचाल भिरभिरते  मन 
 
स्वतातच मग्न 
विचारात कोंडून घेते 
स्वताशीच झुंझत मारामारी करीत बसते 
हरते हरवून घेते 
मरतुकडे होऊन जाते 
भांडत बसते सतत दुसर्याशी मनातल्या मनात 
जळत बसते त्याची झळ स्वताला 
हे चंचल चवचाल भिरभिरते  मन 
 
  
किती शिकवायचे मनाला 
किती सांगायचे मनाला 
नकोरे असा वागू 
नकोरे असा रडू 
नकोरे करवादू 
मन म्हणजे कुत्र्याचे शेपूट 
करा सरळ परत वाकडे ते  वाकडेच 
हे चंचल चवचाल भिरभिरते मन 
 
कसे अये मन कसे असे झाले 
कधी होईल निवांत 
कशे होईल ते शांत 
मेल्या शिवाय कसे शांत ते होणार ..?
जेव्हा जाईल प्राण तेव्हां 
ते गप्प शांत निवांत 
ध्यान लावून बसेल ..
किती होऊदे कल्लोळ 
ध्यान नाही तुटणार 
हे चंचल चवचाल भिरभिरते मन