"आम आदमी"
आम आदमी वाऱ्या वरती ।।ध्रु॥
किती बजेट हे येती जाती ॥
बाळगी उराशी आशा मोठी ।
परी निराशा त्याचे गाठी ॥
दारिद्रात तो सदा राही,
कधी ना होती स्वप्ने पुरती ॥ध्रु॥१॥
कधी हरकती बागाईतदार ।
कधी सुखावे कारखानदार ॥
हर्षभराने नोकरदार हा,
मारी उड्या वर खालती ॥ध्रु॥२॥
अनंत खोंडे.
२\३\२०११.