वेदनांचा मी सखा, तो कोण होता ?
थेट माझ्या सारखा तो कोण होता?
न्याय जो मिळतो उशीरा न्याय कसला?
लाख दिधल्या तारखा तो कोण होता ?
अर्थसंकल्पात मज दिसलाच नाही
भाकरीला पारखा तो कोण होता
वाचला कौटिल्य सारा मज कळेना
पाठ दिधला "लाच खा" तो कोण होता?
खेळ घेता खेळ पैशाचाच केला
लोकनेता ओळखा तो कोण होता?
लाल बत्ती कार येता बंद रस्ते
त्यातला तिस्मारखां तो कोण होता?
झाकरे "निशिकांत" नाराजी जरासी
कुरतडी अपुल्या नखा तो कोण होता?
निशिकांत देशपांडे मो.नं. ;-- ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा