दिवस यायचा बाकी आहे

खूप सोसले फक्त दिलासा बाकी आहे
अजून माझा दिवस यायचा बाकी आहे

साकीला ही, नजर शोधते सायंकाळी
दु:ख प्यायला माझा पेला बाकी आहे

जगात माझ्या मीच वेगळा मला वाटतो
इथे न कोणी माणुस साधा बाकी आहे,

तुझ्या वेदना निघून गेल्या खूप दूरवर
घाव नवे अन, खोटी आशा बाकी आहे

मना सारखे आता माझ्या जगेन मी पण,
अजून कळणे कोण मी माझा बाकी आहे.

----------------------स्नेहदर्शन