झोक्यावरती हिंदोळावे मस्त जगावे
लाख असूदे काटे त्यातच फूल फुलावे
दु:ख किनारी आनंदाच्या शोभुन दिसते
मोसम कसले? बाराही मधुमास म्हणावे
भाग्य लिहाया सटवाई क येत असावी ?
तळहातीच्या रेखांनाही मी बदलावे
काळ्या दगडावरची झालो रेघ कशाला?
हटवादीपण माझ्यामधले मीच पुसावे
खांद्यावरती डोके ठेऊ मी कोणाच्या ?
गजलातुन मी ओघळणारे दु:ख कण्हावे
ज्ञानाविन ते प्रवचन कसले? पोपटपंची
अंधारी जर प्रतिभा दिसली भाग्य म्हणावे
भ्रमराला तर वेडच असते मधुगंधाचे
सुर्यास्ताला रात्र उजवण्या कैद असावे
कल्पतरुच्या पानामधुनी एक कवडसा
येवुन सुचवी गजला अन मी फक्त लिहावे
वाट कुणी जर बघते उघडुन दार जरासे
प्रतिसादास्तव "निशिकांता"ने मंद हसावे
निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा