कोडे

स्मृती संपता, मिती संपता 
जन्मा येती नवथर वेळा 
अजाणतेच्या शिरी लेवूनी 
प्रारब्धाच्या गणिती कळा

अस्तित्वाचा शृंगार असो वा
असो निजणे ते सामर्थ्याचे
घाव एकटा पुरतो अंती 
रूप दिसाया अन नियतीचे 

मैफिलीतही सूर एकटा 
सांगत बसतो सुन्न विराणी 
मैफल म्हणते जळले लक्षण
हवी कशाला शिळी कहाणी?

जन्माचे हे अचूक कोडे 
गुंता मोठा जरी धागे थोडे 
विसरायची जी वरात सारी 
तिच्याच मागुनी स्वप्नाळू घोडे