मनातल्या संगणकात आपण डेटा फीड करत असतो.
आणि रोज नव्या फाइल तयार करत असतो १
त्यातील काही आपण सेव्ह करायच्या असतात
नको असलेल्या काही डिलीट करायच्या असतात २
तरी एकादी फाइल मध्येच करप्ट होत असते
सेव्ह केलेला डेटाही डिलीट करून जाते ३
सेव्ह केलेल्या सगळ्याच फाइल नेहमी लागत नसतात
केव्हातरी शांतपणे सर्फ करायच्या असतात ४
अकारण त्या उघडल्या तर परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात
म्हणूनच काही फाइल विजिबल असतात तर काही फाइल
जाणीवपूर्वक इन्विजिबल ठेवायच्या असतात ५
राधामोहन तथा डॉ. सुधीर कुलकर्णी