धमन्यांत वाहते रक्त होऊनी पाणी..
अन् थिजलेली.. थकलेली माझी वाणी..!
मी तिथेच आहे, तेंव्हा जेथे होतो..
ही तुझीच झाली प्रगती केविलवाणी..!!
का थांबलीस तू तेंव्हा जाता जाता?
परतून येत मी असता, गेलीस आणि..?
भांबावुन मीही गेलो होतो तेंव्हा..
रडलीस तूच पण, डोळा आले पाणी..
का ऋतू सरावा असला बिन् "बहराचा?"
ह्या वर्षी ही का हेच पुराला पाणी???
-- बहर.