पहिला पाऊस

आज बरसल्या पहिल्या धारा , आला मेघाचाही नाद

त्यास मिळाली सौदामिनीची उत्कटतेने साथ  १

तृषार्त होती सारी धरणी तहानलेली झाडे ,

 आसुसलेली सारी सृष्टी नद्या कोरडे नाले  २

भिजली धरणी भिजले पक्षी ओलीचिंब झाली झाडे

तव स्पर्षाने झाले वेडे अन सर्वांगाने ओले  ३

पडलो मी या शय्येवर पाहत होतो तुला दूरवर

ओढ लागली तव भेटीची मनात होती थोडी हुरहूर  ४

एक खिडकी हळू थरथरली ओली झुळूक घेऊनी आली

साथीला मृदगंधही होता , जाणवले तो मजसाठी होता  ५

हुरहूर गेली मळभही गेले गात्र रंध्र ते पुलकीत झाले

मम कायेच्या घरट्यामधले मन-पाखरू झाले चिंब ओले  ६