पाऊस आला ... घन हळवे झाले
पाऊस आला ... मन हळवे झाले
पाऊस आला ... मेघांतून मल्हार
पाऊस आला ... मातीतून गंधार
पाऊस आला ... मोतीसर पागोळ्या
पाऊस आला ... भिजलेल्या रांगोळ्या
पाऊस आला ... अंगणभरूनी पाणी
पाऊस आला ... अंगी झिम्मड गाणी
पाऊस आला ... कोंब नवे हुळहुळले
पाऊस आला ... पिकले पान ओघळले