''मी तुझा,तुझा असेन आमरण ''

संशया करु नकोस आक्रमण
मी तुझा,तुझा असेन आमरण
सांगतो मनास, "विसरलो तुला"
हीच तर तुझी मुळात आठवण
फ़ुंकणे,पिणे असभ्य वाटले
आजकाल हेच सभ्य आचरण
हासण्यास माझिया फ़सू नका
हासणे मुखावरील आवरण
बोलवे कुणी,तिथे न जायचो
पोचलो तिथे,जिथे न आवतण.
--डॉ.कैलास गायकवाड