हृदयाची करून राख
फासली जगाला
बिनआठ्यांची फटक कपाळे
शुभ्र कलाबुती
दोलायमान चित्ती
नैराश्याकडे झुकत चाललो मी
ती देईल का शांती
ती स्वतःच जळते
मिणमीण
रोजच्या रात्री
दारूमध्ये डुबकी
कोरडे पसारे
पांगळे सारे
हवेत विरघळत
मेंदू कुरवाळत
जुगारात ऊफाड्याच्या नोटा
अनेक पत्ते त्यांचे
निवडक जोकर
ईशाऱ्यावर लचकती
सुशिक्षित संसारी
भयाण, भेसूर अंधारी
का पेटली
मग विलक्षण होरपळली
सभ्य, सात्त्विक
एक सुगंधी अगरबत्ती
झोपतो माझ्याच मीठीत मी
ऊघड्या अंगाने
निधड्या तत्त्वाने
योजना ओरबाडीत
काळोख चुरगाळीत
ढगाळले ना कोणी
ना झूळुकले
अस्थिपंजर शरीर
नखे माझी रक्ताळलेली
खोबण्यात भिरभिरती