मीच आई....एक पुजारी...

मीच आई एक पुजारी, गीत गाते तुझे बासरी
वाजवशील तू मधूर सुराने ऐकते मीच वेड्यापरी......
मीच आई एक आशा, रंग उषा तुच पुर्व दिशा
किरण केशरी भाव कळ्यांचे उमलतांना मीच बावरी....
मीच आई एक भावना, स्वप्नी रंगते तुझी कल्पना
तू भरशील रंग तरहेतर्हेचे  बघते कौतुक मीच सागरी...
मीच आई बाग हिरवी, पानोपानी तुझी थोरवी
फुलाफुलांवर सुगंध तुची बांधून घेते मीच पदरी......
मीच आई एक ज्योती, तुज रोशन अवतीभोवती
बघतांना तू गं तिथेच थांबली एक प्रतिमा एक हासरी...
मीच आई एक आरती, शब्दफुलांवर तुझीच मुर्ती
ओवाळीता संगीत तुजला  सुरते मीच तुझ्या मंदीरी...
मीच आई एक दगड, शिल्पकार तू आहेस अवघड
घाव घनाचे जनामनाचे सोसुनी घेते मीच अंतरी .....
अनुसया गंगारामजी तिड़के 
(अमरावती)