वापस कालन्या गेल्तो सालेनं
मन भरून अला
हीच ती साला
साला कवा अभ्यास नाय केला
निखला दंगा केला
आक्कालच कमी होती
मार खाल्ल्याची लाज न्हवती
धावी-बारावीन पन कलला नाय
मार्क परले चांगले तरच
बाला, ह्या जगानं किंमत हाय
समाजाचे मार्ग उरफाटे
जरा चूकला
का मंग काटेच काटे
बघता बघता मी मोठा झालो
आनी मागं वलून बघतो
तर नसिबाला दोष देता झालो
हां पन जिद नाय सोरली
पुन्ना अभ्यास केला
अन मोठ्यात मोठी डीग्री मिलवली
रास म्हेनत केली पन
साली जुनी चुक झालेली
भलभलत ऱ्हायली
आता भासण करतांव
तवा ह्याच बोलतांव
उशिरानं केलेल्या कमालीला
जग मानतो पन वय अन वेल
वेगानं पलतात
कईच हाती लागत नाय
आता फकस्त अवराच व्हईल
लोक बोलतील
एक हुशार मानुस मेला
त्यांना कं म्हाईत
त्यो मानूस दहावी- बारावीत
काही टक्के कमी परल्याने
आयुष्यभर मेला.