वेदना

वेदना

एकटेपण भोगतोय मी
स्वकीयांच्या घोळक्यात
सतत बडबडतो मी
आठवणीच्या विळख्यात

माहीत नाही अजून
किती वाट तुडवायची
माहीत नाही अजून
किती वेदना द्डवायची

आपुल्या हाताने
आपुली नियती घडवायची
नशिबाला दोष न देता
आपुलिच पाठ बडवायची

राजेंद्र देवी