'सा 'रे' च 'ग' 'म' 'नी' चे 'प' ड 'सा' द

लक्षले  जे आलक्षुनी ते धावता लक्षाकडे,
कितीक थांबलेले ते सूर होते बापुडे,
सांगताही यायची ना आर्तता त्यांची मला,
अर्थावेड्या जाणिवांना समजले ना साकडे..
 
देखुनीही  देखलेना त्या सुरांना मी कधी,
लागली मज लक्षण्याची अहमिका त्यांच्यामधी,
या गळ्यातून त्या सुरांना मी कधी ना गाईले,
शब्दरूपी काव्य सोहोळे आहेत कि मी बांधिले..
 
स-गुणात्मक मुर्तातेचे आहे मला संमोहन,
निर्गुणाची अमूर्तता आहे म्हणे विलक्षण,
स-गुणात्मक मुर्तातेला शब्दरूपी आसन,
सूर असती अ-मुर्तातेचे निर्गुणी विवेचन..
 
सूर जे येतील लेऊन शब्दरूपी बंधने,
त्या सुरांना मानते मी या मनाची स्पंदने,
ज्या सुरांना शब्द नसती शुष्क ती आवर्तने,
आर्तता त्यांची असे जी, भासती मज रुदने..
 
सामवेदातून येत "सूर" होती "देवता".
मानते मी त्या सुरांना शब्द देती पूर्तता..
त्या सुरांचे या सुरांशी काय असते सोयर,
माय म्हणती त्या सुरंना, या सुरांना लेकुर..
 
 
केतकी..
२/८/२०११