अश्रु...
आता सरणालाही
चटावलाय जीव
रोज घेई
चितेवरी धाव
रोज जळतो अन
पुन्हा पुन्हा होरपळतो
आठवणीच्या राखेतून
पुन्हा पुन्हा उजळतो
पाहिलेस का कधि
माझे वितळलेले मन
त्यावर पसरलेले
अश्रूचे कण
अश्रूंची जेंव्हा वाफ होते
हलकी होऊन ढगात जाते
उद्वेगाची जेंव्हा वीज कडाडते
अश्रूंची पुन्हा बरसात होते.
राजेंद्र देवी