भोळा

जाहलो मी विसरभोळा

टोळभैरव रोज गोळा
कोडग्यांचे राज्य आता 
पाप झोपे नित्य डोळा 
रोज शिमगा रोज बोंबा
बंद झाला बैल पोळा
सुप्त आहे तीच इच्छा
पार झाली वर्ष सोळा
नव्हती माझी कधी ती
मी तसा नाहीच भोळा
बायको ती  आज माझी
पाहता का, नेत्र चोळा