जगात दुर्लभ शहाणपण लाभले फुलांना
कधी मिटावे, कधी खुलावे कळे फुलांना
मुकी असू द्या, करू नका बोलते फुलांना
कशास बभ्रा, कुणी, कुठे हुंगले फुलांना
सुवास येतो दुरून दृष्टीपथात नसता
तुम्हीच सांगा, जमेल लपणे कसे फुलांना
अधीर तो होउ दे कितीही मिठीत घेण्या
हळू हळू उमलणेच शोभे, सखे, फुलांना
कुवार असली तरी न आता अजाण उरली
मिलिंद, उद्देश गुंजनाचा कळे फुलांना