" हिरवळ"
हिमनगाच्या शिखरावरती,
हिरवी तरू दाट ।
नागमोडी ही वरी जातसे,
सुंदर पाऊल वाट ॥
विविध फुलांनी सजली जणू,
नव नवेली वाटे।
पिकलेल्या रान फळांनी,
सडा विखुरला वाटे ॥
पहा प्रभूची सुंदर किमया,
सर्वांना मोहित करते ।
थकलेल्या पांथस्थाना ही ,
प्रसन्न छाया देते ॥
आज मानवा सांगावे वाटे,
नका निसर्गा नासू ।
जर! संपली राने उपवने,
तर! "डोळ्यात येतील आंसू"२
अनंत खोंडे. २१।९।२०१२.