डोळ्यात गोठलेले....

डोळ्यात गोठलेले वाहून थेंब जावे

गालावरील आसू कोणी तरी पुसावे....

ती वेस उंबऱ्याची ओलांडतो कधी मी

तेव्हा कुणीतरी बाहूंचे कुंपण करावे....

वादळ निघूनी जाता घरटे कुठे दिसेना

तेव्हा कुणीतरी मायेचे छप्पर धरावे....

जाती उडून जेव्हा या रंग जीवनाचे

वेचून या फुलांचे उधळून रंग जावे....