ज्यचीकालही गेल , आजही जाईल
रोज नवीन दिवस येईल ....
त्याच्या माझ्यातले अंतर
एकेक दिसाने कमी होईल ,
रोज म्हण्तो भविष्यात
मनाजोगे जगेन आयुष्यात
वर्तमानाच्या सारीपाटावर
मांडलाय पेचांचा डाव
त्यात रमायचे सोडून
घेतोय भविष्याचा ठाव,
कळतयं सारं काही
अजूनही वळत नाही
कोणती अद्रूष्य माया
उमजून ते देत नाही ,
आणलीय ज्याची त्यानी
आपुली श्वासांची शिदोरी
उधारीला वाव नाही
भागीदारीची सोय नाही
संपवल्या शिवाय येथून
परतीची वाट नाही,
कोण कुणाचा , मी कुणाचा
व्यवहार हा देण्याघेण्याचा
मागील उणे-अधीक फेडण्याचा
फेडताना नवीन देणे करण्याचा
त्यासाठीच का नव्यानं जन्मण्याचा.....?